ZP Election: प्रचाराच्या पॅम्पलेटवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू अन्..., शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार

Black Magic Outside Shinde Sena Candidates House: सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घराबाहेर जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रचाराच्या पॅम्पलेटवर हदळ-कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू, चपाती असे एका कापडात गुंडाळून ठेवण्यात आले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोहोळ तालुक्यातील पेनूर गटाचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या घराबाहेर काळी जादू केल्याचा प्रकार उघड झाला. यामध्ये दोन चपातीवर चवरे यांच्या प्रचाराचे पॅम्प्लेट, त्यावर हळदी-कुंकू, तसेच लिंबावर सुई-टाचण्या लावल्याचा प्रकार समोर आलाय. एकनाथ शिंदे यांच्या फोटोवर हळद-कंकू टाकण्यात आल्यामुळे सोलापूरात खळबळ उडाली आहे.

मोहोळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटातून चरणराज चवरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चरणराज चवरे यांनी सांगितले की, 'माझ्या घराबाहेर हा प्रकार केल्याचा मला आनंद आहे. कारण सामान्य जनतेने यांना जादूटोण्यापर्यंत आणले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाल्यानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय. इथे जी लिंबू टाकलेत त्याचा सरबत करुन पिण्याची ताकद आमच्यात आहे. दरम्यान सकाळी ही घटना कळताच परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com