BJP worker death Mumbai : मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचं प्रकार समोर आला आहे. वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा कार्यकर्ता सोलापूरमधील आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवास खोलीमध्ये कार्यकर्त्याचा मृत्यू झाला.
सोलापूर उत्तरचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्या कार्यकर्त्याचे नाव चंद्रकांत धोत्रे असं आहे. चंद्रकांत धोत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. वेळेत ॲम्बुलन्स न मिळाल्याने जीव गमावावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम ॲम्बुलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रेने केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.