Saam Maha Exit Poll : शरद पवार-अजित पवार गट एकत्र आले, पण एकटा भाजप चारणार धूळ

Maha Exit Poll Predicts BJP Victory in Mhaswad Civic Elections : साताऱ्यातील म्हसवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले. पण भाजप तिथं सत्तेत येऊ शकतं. नेमकं काय होतं तिथलं गणित जाणून घेऊयात..

ओंकार कदम, सातारा

साताऱ्यातील म्हसवड नगरपालिका निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. प्रचाराच्या काळात दिग्गज नेते तिथं ठाण मांडून बसले होते. एकट्या भाजपविरोधात तीन प्रमुख पक्ष एकवटले होते. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच रासप हे तीन पक्ष भाजपविरोधात रणांगणात होते. साम टीव्ही महाएक्झिट पोलनुसार, साताऱ्याच्या म्हसवड पालिकेवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या नगराध्यपदाच्या उमेदवार पूजा विरकर या निवडून येतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

म्हसवड पालिकेवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता असून, ११ नगरसेवक निवडून येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पालिकेत एकूण २० सदस्यसंख्या आहे. तर नगराध्यक्ष जनतेतून निवडून द्यायचा होता. नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपच्या विरकर आणि दोन्ही राष्ट्रवादी-रासप या तीन पक्षांकडून राजमाने या रिंगणात होत्या. पण अखेर भाजपच्या विरकर या बाजी मारताना दिसतात. आता प्रत्यक्ष निकालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com