भाजपने तिकीट नाकारलं, महिला उमेदवाराच्या आईला ह्रदयविकाराचा झटका|VIDEO

Vanita Bane Hospitalised After BJP Ticket Controversy: भाजपकडून तिकीट नाकारल्याच्या धक्क्यामुळे माजी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण तापले आहे.

मिरा भाईंदर महानगरपालिकेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 30 तारीख शेवटचा शेवटचा दिवस होता. भाईंदरमध्ये श्रद्धा बने यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र आता त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांच्या आईने मोठा धसका घेत त्यांना हृदयविकारचा झटका आला आहे. श्रद्धा यांच्या आई माजी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता बने यांना हा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ मीरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. यानंतर आज शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपच्या माजी महिला जिल्हा अध्यक्ष वनिता बने यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली, यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भाईंदरमध्ये भाजपकडून त्यांची मुलगी श्रद्धा बने हिला महापालिका निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याच्या धक्क्यातून वनिता बने यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे तिकीट वाटपातील नाराजीमुळे मीरा-भाईंदरमधील भाजपमध्ये असंतोष वाढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com