राज्यातील सर्वात 'ढ' पक्ष म्हणजे उबाठा, नगरपालिका निवडणुकीनंतर कोणी केली टीका? VIDEO

Ravi Rana Criticizes Thackeray Brothers Alliance: भाजपचे आमदार रवी राणा यांनी ठाकरे बंधू आणि मनसेच्या युतीवर जोरदार टीका केली. त्यांनी या युतीला मजबुरीचे उदाहरण ठरवले आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय हेतूंवर प्रश्न उपस्थित केले.

भाजपचे आमदार रवी राणा यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला. राज्यात उबाठाची हालत ही घराबाहेरी वर्हांड्यातील बाकड्याप्रमाणे झाली आहे. महाराष्ट्रात सर्वात 'ढ' पक्ष म्हणजे उबाठा आहे. उबाठा आणि मनसेचे युती म्हणजे ही मजबुरी आहे, भाजपला थांबण्यासाठी ते एकत्र येत आहे. मात्र, बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार हे भाजपमध्ये आहे. उबाठा आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत मनसेसोबत युती करत आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी बेचैन झाले आहे. त्यांना महाराष्ट्राचं काही घेणं देणं नाही. मुंबईच्या महानगरपालिकेतून उद्धव ठाकरे यांना दररोज इन्कम मिळते. त्यासाठी आपलं वसुलीचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू राहिलं पाहिजे यासाठी हे सगळं सुरू आहे. अशा तीव्र शब्दात आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com