महापालिका निवडणुकांतही घराणेशाही! भाजप आमदाराची मुलगी, मुलगा अन् दीराने भरला उमेदवारी अर्ज|VIDEO

Seema Hire Devyani Pharande Family Nominations News: नाशिकमध्ये भाजप आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने घराणेशाहीचा आरोप होत आहे. कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिकमध्ये भाजप आमदार सीमा हिरे आणि देवयानी फरांदे यांच्या घरातील व्यक्तिंनीच उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सीमा हिरे यांची मुलगी रश्मी हिरे आणि दीर योगेश हिरे, तसेच देवयानी फरांदे यांचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रभागात एकत्र फॉर्म भरलेले आहे, असे सांगत उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. महायुतीच्या अधिकृत घोषणेची वाट न पाहता हे अर्ज भरण्यात आले असून, यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या घडामोडींमुळे नाशिकच्या राजकारणात घराणेशाहीची चर्चा रंगली आहे.

मागच्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक येथील भाजप कार्यालयामध्ये बाहेरून आलेल्यांना पक्षात प्रवेश दिल्याने मोठा राडा झाला होता. कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला होता यामुळे भाजपच्या संकटमोचकांना मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांना कार्यकर्त्यांसाठी अश्रु अनावर झाले होते. मात्र आज कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळता घरातील सदस्यांना मिळाल्याने आता कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com