VIDEO : राजकीय खलबतांना वेग; आशिष शेलार - राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थावर चर्चा

Meeting On Shivtirth : भाजप आमदार आशिष शेलार हे शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले असून या भेटीचं कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली आहे. आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आशिष शेलार हे शिवतीर्थावर दाखल झाले. मात्र या भेटीमागचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे ही चर्चा नेमकी कोणत्या विषयांवर आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवतीर्थावर होणारी ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय खलबत सुरू असून याच अनुषंगाने आज भाजप नेते आशिष शेलार हे शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सकाळीच दाखल झाले आहे. गेल्या तासभरापासून त्यांच्यात चर्चा सुरू आहे. मात्र या भेटीचं कारण अद्यापही समजलेलं नाही. मात्र दोन्ही पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर केल्यानंतर आता या भेटीला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com