Dr. Hina Gavit : उमेदवारीसाठी हिना गावित आक्रमक, आज घेणार देवेंद्र फडणवीसांची भेट

Dr. Hina Gavit Interested To Contest Assembly Elections : अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी डॉ. हिना गावित इच्छुक असून त्यासाठी आज त्या मुंबई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असून आज त्याच अनुषंगाने त्या देवेंद्र फडवणीस यांची भेट घेणार आहे.

लोकसभेमध्ये पराभुत झालेल्या डॉ. हिना गावित पक्षाने संधी दिल्यास अक्कलकुवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघातील गावागावत दौरे करत कार्यकर्त्यांसोबत संपर्क वाढवला आहे. भाजपा आणि शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत राज्यातल्या या पहिल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर होऊ शकलेला नाही. हि जागा शिवसेना शिंदे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने ही जागा स्वत: लढवावी यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह असून डॉ. हिना गावित यांची आजची फडवणीस भेट याच अनुशंगातून असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. कालपासून डॉ हिना गावित मुंबईत दाखल झाल्या आहेत.

दरम्यान, कॉंग्रेस मात्तबर नेते माजी मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ असल्यानं याठिकाणी त्यांना शह देण्यासाठी डॉ हिना गावित उत्तम पर्याय असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र शिंदे गट या मतदारसंघासाठी आग्रही असून शिवसेनेतही तब्बल तीन इच्छुकांमध्ये रस्सीखेच असल्यानेच आजच्या फडवणीस भेटीनंतर नेमकं राज्यातल्या पहिल्या क्रमांकाच्या मतदारसंघाबाबत काय होतं याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com