Rajan Teli News : ठाकरेंचा भाजपला धक्का; मातोश्रीवर राजन तेली यांचा पक्ष प्रवेश

Rajan Teli Join Udhhav Thackrey Group : राणे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भाजप नेते राजन तेली यांनी भाजपमधून बाहेर पडत आज उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश केला आहे.

भाजप नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करत मशाल हातात घेतली आहे. मातोश्रीवर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला आहे. राजन तेली हे राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. तर नेते दीपक केसरकर यांचे ते कट्टर विरोधक आहेत. मात्र त्यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हातावर बांधलं आहे.

दरम्यान, राजन तेली यांच्या प्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. अँजिओग्राफीनंतर आज पहिल्यांदाच ते बोलत होते. यावेळी बोलताना, ''दसऱ्यानंतर पहिल्यांदा समोर आलो. मधल्याकळत हॉस्पिटल वारी केली. आता आराम नाही हराम्याना घालवायचे आहे. मुहूर्त चांगला लागलाय. मशाल कशी पेटवायची आणि कोकणला चटके कसे द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. आपला विजय नक्की आहे. उमेदवारी अजून कोणाची जाहीर केली नाही. फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोचवा. संगोल्याचा आमदार गद्दार झाला, पण तुम्ही माझ्यासोबत आहात आणि शब्दाला जागाल,'' असा विश्वास ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com