Eidi From BJP : रमजान ईदच्या काळात गरीब मुस्लिमांना मदतीचा हात म्हणून भाजपकडून 'सौगत-ए-मोदी' मोदी कीटचे वाटप करण्यात येणार आहे. भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी याबाबतची माहिती दिली. देशातील ३२ लाख मुस्लिम कुटुंबाला ही कीट देण्यात येणार आहे.
ईदनिमित्त भाजप देशात सौगत-ए-मोदी’ अभियान राबवणार आहे...या अभियानाअंतर्गत 32 लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना ‘सौगत-ए-मोदी’ किट्सच वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये भेटवस्तूंचा समावेश आहे...मशिदींद्वारे गरजू मुस्लिमांना हे किट वाटले जाणार आहे. अल्पसंख्याक आघाडीचे 32 हजार पदाधिकारी ३ हजार मशिदींमध्ये जाणार आहेत.
सौगत ए मोदी किटमध्ये काय काय ?
एका किटची किंमत अंदाजे ५०० ते ६०० रूपये इतकी असेल. त्यामध्ये कपडे, शेवया, खजूर, सुकामेवा आणि साखर या किटमध्ये असणार आहे. महिलांसाठीच्या किटमध्ये सूट मटेरियल असेल, तर पुरूषांच्या किटमध्ये कुर्ता पायजमा मटेरियल असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.