Pune protest over Tipu Sultan remark details : हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुल्तान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील बालगंधर्व चौकात भाजपने जोरदार आंदोलन केले. त्याला काँग्रेसकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पुण्यात आमनेसामने आले. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. भाजपने लोकशाही मार्गाने आंदोलन केले नाही, असे म्हणत काँग्रेसकडून प्रत्युत्तरदाखल आंदोलन काढण्यात आले.
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाले. भाजपच्या वतीने काँग्रेस हाऊसवर मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झालेला पाहायला मिळालेय. काँग्रेस भवन समोर भाजपचे कार्यकर्ते जमले. तर काँग्रेसकडूनही भाजपला प्रत्युत्तर दिले जाणार आहे. पुण्यात काही काळासाही वातावारण तापले. शिंदे,जगताप शिवाजी महाराजांचे मावळे आहेत की टिपू सुलतानच्या अवलादी असे म्हणत पुण्यातील भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे व काँग्रेस नेते प्रशांत जगताप यांना घाटेंचा सवाल केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.