राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार? ठाकरेसेनेचे 13 आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात, कॅबिनेट मंत्र्याचा दावा|VIDEO

Sanjay Shirsat Claimed About Thackeray Faction: नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. संजय शिरसाट यांनी ठाकरेसेनेचे 13 आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा करत राजकीय वातावरण तापवलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी शिंदेसेनेचे 22 आमदार फुटणार असल्याचा दावा केल्यानंतर आता शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी याला प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे 13 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा केला आहे. आजपासून विधिमंडळाचे नागपूरमध्ये कामकाज सुरू झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवर हे अधिवेशन चांगलेच तपण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच ठाकरे यांनी दावा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

तर ठाकरेसेनेचे 13 आमदार शिंदेसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलाय. त्या सगळ्या आमदारांची नावे माझ्याकडे आहे. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीरपणे सांगणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. ठाकरेसेनेच्या कार्यपद्धतीला ते वैतागले असून ते लवकरच शिंदेसेनेत येणार असल्याचे संजय शिरसाट म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाचा दावा सत्य ठरतो आणि राजकारणात काय उलथापालथ होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com