VIDEO: Dharashiv आणि संभाजीनगरच! नामांतर प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Aurangabad and Osmanabad Name Change News: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतरावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.

धाराशिव आणि संभाजीनगर शहराच्या नामांतर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे. नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. नाव देण्याचा आणि बदलन्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. परंतु त्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. निजामांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जात असल्यांच याचिकेत म्हटलं होतं. तर आता नामांतर प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. नाव बदलल्यास समर्थन आणि विरोध होणारच असं कोर्टाने म्हटलं आहे. अलाहाबाद आमि औरंगाबाद प्रकरण सारखं नसल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com