ZP transfer stayed : जनगणनेसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

ZP transfer stayed for census 2026-27 : जनगणनेसाठी महाराष्ट्रातील फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. जिल्हा परिषदांच्या क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिलीय.

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतामध्ये जनगणना २०२६-२७ सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जनगणनेसाठी राज्यातील फडणवीस सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट क आणि गट ड मधील कर्मचारी बदल्या थांबवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली.

जनगणना २०२६-२७ प्रक्रिया प्रभावी आणि यशस्वी पार पाडण्यासाठी महायुती सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला असून, जिल्हा परिषदांमधील क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिलीय. जनगणनेशी संबंधित शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांना स्थगिती दिल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे जनगणनेसाठी आवश्यक मनुष्यबळ स्थिर राहणार असून, माहिती गोळा करणे, नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com