VIDEO: Chhatrapati Sambajinagar मध्ये भाजपला मोठा धक्का, 16 नगरसेवकांचा ठाकरे गटात प्रवेश

Raju Shinde Resign BJP News: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला मोठा धक्का, राजू शिंदेंसह १६ नगरसेवकांचा भाजपला राम राम.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. अतूल सावे आणि रावसाहेब दानवे यांनी भाजप नगरसेवक राजू शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते परंतु ते अयशस्वी ठरले आहेत. राजू शिंदे आपल्या समर्थक नगरसेकांसह ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. शनिवारी राजू शिंदे आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. मात्र राजू शिंदे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम आहेत. राजू शिंदेंसह १६ नगरसेवकांनी भाजपला राम राम ठोकला आहे. राजू शिंदेंचा आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला कसा फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com