VIDEO: Bhiwandi शहराला मुसळधार पावसाचा तडाखा, सखल भागात साचलं पाणी

Bhiwandi Rain News: रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भिवंडीमधील जनजीवण विस्खळीत, सखल भागात साचलं पाणी.

भिवंडीमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा फटका हा लोकसेवा आणि वाहतुकीवर होत आहे. तर आता भिवंडीमध्ये देखील पावसाने हाहाकार माजवल्याची माहिती समोर येत आहे. अनेक सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून भाजी मार्केट, नझराणा सर्कल परिसर हा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे तीन बत्ती,मंडई ,शिवाजी चौक देखील जलमय झाला आहे. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवण विस्खळीत झाले असून लोकांच्या घरात देखील पाणी शिरले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com