Bharat Gogawale: निमंत्रण पत्रिकेमुळे रायगडमध्ये पुन्हा वाद! सुनील तटकरेंना मान, भरत गोगावलेंना डावललं|VIDEO

Political Tensions Between Shivsena And Ncp In Raigad: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव-इंदापूर बायपासच्या भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेना मंत्री भरत गोगावले यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळण्यात आले.

मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव आणि इंदापूर या रखडलेल्या बायपास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडत आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे नाव पुन्हा एकदा वगळण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

याआधीही रोहा येथील डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृहाच्या कार्यक्रमात गोगावले यांना राष्ट्रवादीने डावलण्यात आले होते. ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता पुन्हा इंदापुर आणि माणगाव बायपास कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजप नेत्यांना सोबत घेऊन शिवसेनेला डावळण्याची खेळी राष्ट्रवादीने केली असून याची उलट सुलट चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुध्द शिवसेना वादात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com