Maharashra Politics: नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम, आता रायगड संदर्भातील बैठकीला गोगावलेंची दांडी, चर्चांना उधाण|VIDEO

Gogawale vs Tatkare Row: रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळच्या पर्यटन आराखड्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी मात्र दांडी मारली.

भरत गोगावले आणि अदिती तटकरे यांच्यात मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून मोठा वाद चालू आहे. अद्यापही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी देखील खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची एका जाहीर कार्यक्रमात नक्कल केली होती. यावरून पुन्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि मारळच्या पर्यटन आराखड्यासंदर्भात अजित पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला मंत्री भरत गोगावलेंनी मात्र दांडी मारली होती. या बैठकीला मंत्री आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, शंभुराज देसाई आणि शिवेंद्रराजे भोसलेंसह सुनील तटकरे उपस्थित होते. मात्र, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक असलेले भरत गोगावलेंनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com