Video : गोगावलेंनी शिरसाटांवर साधला निशाणा

Bharat Gogavle And Sanjay Shirsat : मंत्रीपदाबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाव न घेता गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.

मंत्रीपदाबाबत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'तुम्हाला मंत्रीपद मिळत असेल तर राजीनामा देतो. अशी एका आमदाराने धमकी दिल्यामुळे आपलं मंत्रीपद हुकलं', असा मोठा खुलासा भरत गोगावले यांनी केला आहे. इतकंच नाही तर आता याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे. नाव न घेता गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला असल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ''एका आमदाराच्या धमकीमुळे मला मंत्रीपद मिळालं नाही. मला मंत्रीपद मिळालं तर राजीनामा देईल असं म्हंटल्यानं मला मंत्रीपदावरुन डावलण्यात आलं. आता याच आमदाराला मुख्यमंत्र्यांनी सिडकोचं अध्यक्षपद दिलं आहे.'' असं म्हणत नाव न घेता गोगावले यांनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, ''मुख्यमंत्री आणि आपल्यात झालेला संवाद असा बाहेर सांगायचा नसतो, ही आधी समजून घेतलं पाहिजे. गोगावले काहीही बोलतात त्यांच्या बोलण्याला फार गांभीर्याने घेऊ नका,'' असं स्पष्टीकरण आमदार संजय शिरसाट यांनी दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com