१५ ते १७ ऑगस्टदरम्यान सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत वाहतूक बदल लागू.
रंधा फाटा मार्गे भंडारदरा प्रवेश बंद, पर्यायी मार्ग निश्चित.
पोलिसांनी पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
अत्यावश्यक सेवांसाठी विशेष सूट दिली जाणार.
15 ऑगस्ट रोजी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदीर रतनवाडी, या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे मुंबई आणि नगर जिल्हयातुन मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. 15 ऑगस्ट नंतर सलग दोन दिवस सुट्टी आलेने उपरोक्त प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची मोठया प्रमाणात गर्दी होण्याची दाट शक्यता व्यक्त होतेय. त्याचप्रमाणे सध्या पावसामुळे रस्ते मोठया प्रमाणात खराब झालेले आहेत. तर काही ठिकाणी काम चालू आहे. सदर भागातील रस्ते अरुंद असल्यामुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करीता वाहतुक नियमात बदल करण्यात आले आहेत. जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घोगरे यांनी आदेशात म्हटले आहे की, दि.15/08/2025 ते 17/08/2025 रोजी सकाळी 7 ते रात्री 8 वाजे पर्यंत बंद राहील . खालील पर्याय मार्गाने आदेश दिले आहेत.
यानुसार रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघुशी फाटा येथुन प्रवेश असेल. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा - वाकी फाटा - चिचोंडी फाटा - यश रिसोर्ट शेंडी भंडारदरा धरण स्पिल्वे गेट - भंडारदरा गाव - - गुहीरे रंधा मार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. यातून फक्त अत्यावश्यक सेवा ॲम्बुलन्स अग्निशामक दल शासकीय वाहने याना वगळण्यात आले आहे पर्यटकांनी - गर्दी बघता नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असुन वाहने देखील चेक होणार असल्याने मद्यपान करणे किंवा मद्य बाळगू नये असे आवाहन राजूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक सरोदे यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.