Maharashtra Politics : विधानसभेत बाप vs लेक सामना रंगणार ?

Father vs Daughter In Vidhansabha : राज्यातील काका-पुतण्याच्या फुटीच्या राजकारणानंतर आता वडील विरुद्ध मुलगी असे समीकरण विधानसभा निवडणुकीत बघायला मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा यांच्या गटातील एक बड्या नेत्याची मुलगी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याने राजकीय समीकरण बदलणार आहेत.

राज्यात सुरू असलेल्या काका - पुतण्याच्या संघर्षामध्ये अजून एक नाव सामील झालेलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आणि राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी विधानसभेत वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे विधानसभेत वडील विरुद्ध मुलगी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

राज्यात काका विरुद्ध पुतण्याच्या राजकारणाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे समोर येत आहेत. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. आता येणाऱ्या १२ किंवा १३ सप्टेंबरला भाग्यश्री आत्राम या शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या या पक्ष प्रवेशाकडे आणि रणनीतीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com