VIDEO: Beed हादरलं! परळी शहरात गोळीबार, सरपंचावर झाडल्या गोळ्या

Beed Firing News: बीडच्या परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना, सरपंचावर झाडल्या गोळ्या.

बीडच्या परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँक कॉलनीत, गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या गोळीबारामध्ये परळी तालुक्यातील मरळवाडी येथील सरपंच जागीच ठार झाले आहेत. तर अन्य एक जण जखमी आहे. ही घटना रात्री 9:30 ते 10 च्या दरम्यान घडली. बापू आंधळे असं सरपंचाचे नाव आहे, तर ग्यानबा गित्ते असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोळीबारादरम्यान सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले आहेत. जागीच ठार झालेल्या दरम्यान ही गोळीबाराची घटना का घडली हे अद्याप समोर आलं नसून परळी पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com