Udayanraje Bhosale: प्लीज, शप्पथ सांगतो...! पंकजा मुंडेच्या प्रचारसभेत बोलताना उदयनराजेंचं इमोशनल भाषण

Udayanraje Bhosale on Pankaja Munde: पंकजा मुंडे यांना तुम्ही निवडून द्याल ना.. नाही तर मी तिला साताऱ्यात माझ्या जागेवर निवडून आणतो, असं म्हणत उदयनराजे यांनी पंकजा मुंडेंसाठी भावनिक साद घातली.

बीड : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत उदयनराजे भोसले यांनी महत्त्वाचं विधान केलं. त्यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्याचं आवाहन करताना एक सूचर वक्तव्य केलं. पंकजा मुंडे यांना तुम्ही निवडून द्याल ना.. नाही तर मी तिला साताऱ्यात माझ्या जागेवर निवडून आणतो, असं म्हणत उदयनराजे यांनी पंकजा मुंडेंसाठी भावनिक साद घातली. ते बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी लोकांनी प्लीज, शप्पथ सांगतो, म्हणत लोकांना पंकजा मुंडे यांना निवडून द्याल ना, अशी इमोशनल विचारणाही केल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे अशी लढत पार पडतेय. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होत असलेल्या या लढतीत नेमकं कोण बाजी मारतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com