Beed News: बीडमधील नर्सिंग वसतिगृहात साप! विद्यार्थिनीने बघताच जागेवर बेशुद्ध|VIDEO

Government Hostel Declared Unsafe But Still Occupied: बीडच्या शासकीय नर्सिंग वसतिगृहात साप आढळल्याने खळबळ उडाली. एका मुलीला शॉक बसून बेशुद्ध झाली असून तिच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. वसतिगृह धोकादायक असूनही ते अद्याप वापरात आहे.

बीडच्या शासकीय रूग्णालयात नर्सिंगच्या मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. याच वसतिगृहात साप आढळल्याने मुलींमध्ये एकच धावपळ उडाली. साप पाहून एक मुलगी चक्क बेहोश पडली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने मुलांचे वसतिगृह कालबाह्य ठरवले होते. या वसतिगृहात मानवी जिवाला धोका होऊ शकतो त्यामुळे सदर ईमारत जमीनदोस्त करावी असे स्पष्ट अहवालात म्हटले आहे. तरीही याच जीर्ण झालेल्या धोकादायक इमारतीत मुलींचा रहिवास आहे. आज साप आढळल्याने अनेक मुली वसतिगृहाच्या बाहेर आल्याच नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com