Maratha Aarakshan: मराठा आरक्षणाला रसद पुरवणारा...; बीडच्या राड्यावर खासदार बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया,VIDEO

Bajrang Sonawane First Reaction On Beed Clash: बीडमधील ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावर खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
Summary

बीडमधील हाके–पंडित समर्थकांमध्ये जोरदार दगडफेक व राडा

खासदार बजरंग सोनवणे यांची पहिली प्रतिक्रिया – "मराठा आरक्षणाला रसद पुरवणारा कोणी नाही"

राजीनाम्याच्या मागणीवर सोनवणे म्हणाले – "तो अधिकार जनतेला आहे"

आगामी आंदोलनातही स्वतः सहभागी होणार असल्याची घोषणा

बीडच्या गेवराईतील ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंह पंडित समर्थकांमध्ये राडा झाला दोन्ही गट आमने-सामने आले आणि दगडफेक झाली. यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की बाहेरच्या जिल्ह्यातून यायचं आणि वातावरण खराब करायचं सुसंस्कृत बीड जिल्ह्याला हिशोबणारी घटना नाही मराठा आरक्षणाला रसत पुरवणारा आणखी कोणी माईचा लाल पैदा झाला नाही आणि मराठा आरक्षणाला कोणी रसदही पुरवली नाही.

ज्यांना रसद घेऊन आंदोलन करण्याची सवय आहे त्या लोकांची तशी दृष्टी आहे ते तसे बोलत आहेत. या आंदोलनाला कोणी आणखी रसद पुरवणारा जन्माला नाही. बीड जिल्ह्यामधील जनतेला माझा राजीनामा मागण्याचा अधिकार आहे. लक्ष्मण हाके माझा राजीनामा मागणारे कोण तेही निवडणुकीमध्ये उभे होते त्यांना किती मतदान पडले हे त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मी एक समाजाचा घटक म्हणून आंदोलनात सहभागी झालो आहे आणि उद्याच्याही आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com