World Cup : महिला संघावर BCCI चा ५१ कोटींचा वर्षाव, हरमनप्रीत कौर दिग्गजांच्या पंक्तीत

BCCI Announces ₹51 Crore Reward for World Cup Winning Indian Women’s Team : भारतीय महिला क्रिकेट संघानं पहिल्यांदाच विश्वचषक जिंकत इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला ५१ कोटींचे भव्य बक्षीस जाहीर केले. कपिल देव आणि धोनीनंतर विश्वविजेता कर्णधार म्हणून हरमनप्रीतची नोंद.

BCCI Indian Women's : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे. विश्वचषक जिंकल्याबद्दल बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाला ५१ कोटी रुपयांचे भव्य बक्षीस जाहीर केले आहे. 'या विजयामुळे हरमनप्रीत कौर आता कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.' १९८३ मध्ये कपिल देव आणि २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर विश्वचषक जिंकणारी हरमनप्रीत ही तिसरी भारतीय कर्णधार ठरली आहे. भारतीय महिला संघाने प्रथमच विश्वचषक जिंकून इतिहास रचला, त्यामुळे बीसीसीआयकडून खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी ही मोठी रक्कम जाहीर करण्यात आली आहे. हा विजय भारतीय महिला क्रिकेटमधील एका नव्या युगाची सुरुवात मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com