Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा एल्गार; बार्शीच्या आमदाराचं ठिय्या आंदोलन, पाहा VIDEO

MLA Rajendra Raut Protest For Maratha Reservation In Solapur : सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटलाय. आमदार राजेंद्र राऊत यांनी आंदोलन सुरू केलंय.

मुंबई : सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बार्शीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी त्यांनी केल्याचं दिसतंय. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांचं आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू झालंय. बार्शीतील शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरु आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, यासाठी आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही, तोपर्यंत दररोज 10 ते 6 आंदोलन सुरु ठेवणार अशा इशारा त्यांनी दिलाय. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सामील झालेले दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकार या बेमुदत ठिय्या आंदोलनाची दखल घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सोलापूरमध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा एल्गार पाहायला मिळतोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com