Barshi News: माजी आमदाराच्या मुलाची तरुणांना भररस्त्यात शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

Runveer Raut viral abuse video in Barshi: बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत याच्या मुलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दोन तरुणांना शिविगाळ करत आहे.

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा रस्त्यावर वाद करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. रणवीर राऊत असं या युवकाचं नाव असून, गाडीला कट लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून त्याने दुसऱ्या व्यक्तीसोबत उघडपणे अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली आणि दमदाटी केली.

घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची आक्रमकता आणि भाषा वापरणं अपेक्षित नाही, असं मत अनेकांनी मांडलं आहे. लोकप्रतिनिधींचे मुलेच जर असे रस्त्यावर समोरच्या व्यक्तीला मारून टाकण्याची भाषा केल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या प्रकरणावर अद्याप कोणत्याही अधिकृत पोलिस कारवाईची माहिती समोर आलेली नाही. मात्र, संबंधित व्हिडिओवरून स्थानिक पातळीवर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. संपूर्ण प्रकाराची चौकशी होण्याची मागणी आता जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com