आत्महत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड करत शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल! बारामतीमधील खळबळजनक घटना

Baramati News: बारामती तालुक्यातील लाटे गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तसा व्हिडीओही समोर आला आहे.

पुणे : बारामतीमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली. हणुमंत सणस असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. बारामती तालुक्यातील लाटे गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली. तसा व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान, आत्महत्येआधी एका चिठ्ठी लिहून शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उलललं. २६ फेब्रुवारीला या शेतकऱ्यानं आत्महत्येचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानुसार, या शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलंय. आपला नेमका आरोप काय? हे चिठ्ठीतून या शेतकऱ्यानं लिहून ठेवलंय. शेती आणि जागेसंदर्भात या शेतकऱ्याची कैफियत होती. आत्महत्येचा व्हिडीओ रेकॉर्ड करत हणुमंत सणस यांनी टोकाचं पाऊल उचललं. या शेतकऱ्याच्या आत्महत्येबाबत सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. सरकारी यंत्रणेच्या चुकीमुळे हा सगळा प्रकार झालेला असून, ही दुर्दैवी घटना असल्यानं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. त्यांनी या घटनेचा निषेधही व्यक्त केला. सरकार असंवेदनशील असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com