Ashadhi Wari 2024: पवार कुटुंबीय राजकारणात विभक्त वारीत एकत्र!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार सगळे एकाच बॅनरवर दिसतायत.

Baramati News: Ashadhi Wari 2024: राजकारणाच्या दृष्टीने बारामती दोन गटात विभागली असली तरी बारामतीकरांसाठी मात्र सारेच सारखे आहेत. असाच काहीसा हा संदेश देणारा एक फलक तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या निमित्ताने बारामती शहरात उभा करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या पंढरीत तुमचे स्वागत असं... वारकऱ्यांचे स्वागत करताना या फलकावर सर्वच पवार कुटुंबाचे फोटो एकत्रित छापण्यात आले आहेत. यामुळे या फलकाची बारामतीसह संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे. बारामतीतील देशमुख चौकात उभारलेल्या या फलकाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com