बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा ताफा, नेमके काय घडले? पाहा VIDEO

Banjara Community Protests Ashok Chavan: नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बंजारा समाजाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा ताफा अडवला. समाजाने एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यसभा खासदार हे आज एका कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे जात असताना त्यांचा ताफा बंजारा समाजाच्या लोकांनी आडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी चव्हाण आणि बंजारा समाजाच्या लोकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही आमच्या आरक्षणाचा प्रश्न तुम्ही का मांडत नाही असा सवाल यावेळी त्यांनी विचारला. तर आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा उपस्थितांनी दिल्या. हे जर करायचं असेल तर मला थांबवलं कशाला? असा सवाल चव्हाण यांनी आंदोलकांना विचारला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी सध्या बंजारा समाज करत आहे. अनेक ठिकाणी हा समाज रस्त्यावर उतरला आहे आणि आरक्षणाची मागणी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com