Bangladesh Clash News : बांगलादेशात अराजक! आंदोलकांनी तोडफोड करत मंदिरांची केली जाळपोळ, VIDEO

Bangladesh Clashes video : बांगलादेशात अराजकाता पसरली आहे. बांगलादेशातील आंदोलकांनी मंदिरांचीही जाळपोळ केली आहे. या जाळपोळीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी सार्वजनिक वस्तूंची तोडफोड केली आहे. या संतप्त आंदोलकांनी काही लोकांच्या घरांनाही आग लावली आहे. यामध्ये क्रिकेटपटूंच्या घराचाही समावेश आहे. बांगलादेशातील या आंदोलकांनी मेहरपूर येथील इस्कॉन मंदिर पेटवून दिलं आहे. आंदोलकांनी तोडफोडीनंतर मंदिराला आग लावली.

मीडिया रिपोर्टनुसार, बांगलादेशातील आंदोलकांकडून २७ जिल्ह्यात हिंदू समाजाचे घर आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहेत. त्यांच्या घरातील किंमती वस्तूही चोरून नेल्या आहेत. तसेच त्यांनी मंदिरांची तोडफोड केली आहे. या मंदिराचा आग लावल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या मंदिराचा आग लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com