Bachchu Kadu News | एक्झिट पोल म्हणजे थोतांड! अमरावतीच्या एक्झिट पोलवरुन बच्चू कडू स्पष्टच बोलले

Bachchu Kadu News | अमरावतीच्या एक्झिट पोलवरुन बच्चू कडूंची सडकून टीका!

लोकसभा निनडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर असल्याचा अंदाजही एक्झिट पोलने वर्तवला. यावरुन बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. एक्झिट पोल हे थोतांड आहे. अमरावतीत प्रहारचे दिनेश बुब हेच विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू 15 ते 20 जागा लढवणार असल्याची त्यांनी माहिती दिली. विधानसभेत बच्चू कडू कुणाबरोबर जातील? याचं उत्तर वेळ आल्यावरच देऊ. असही कडू म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com