Babanrao Lonikar Video: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मविआवर टीका करताना बबनराव लोणीकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले?

Babanrao Lonikar On Sharad Pawar: भाजप आमदार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन थेट शरद पवारांवर जहरी टीका केलीये. त्यांंनी केलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे.त्यामध्येच आता भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar ) यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. म्हणाले, 'मराठा समाजाला फसवणारा बेईमान नेता कोण असेल तर ते शरद पवार' अशी टीका लोणीकरांनी केली.दरम्यान त्यांच्या या टीकेला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule ) देखील जोरदार पलटवार केला आहे. शरद पवारांंवर (Sharad Pawar ) बोलल्यावर हेडलाईन होते असा टोला सुळेंनी लोणीकरांना लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com