Udayanraje Bhosale : औरंगजेब चोर होता, कबर जेसीबीने उखडून टाका, उदयनराजे भोसले भडकले

Udayanraje Bhosale on Aurangzeb : सध्या अधिवेशन सुरू आहे, या काळात एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. परत कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याचं धाडस कुणी केलं नाही पाहिजे, असे उदयनराजे भोसले म्हणाले.

Udayanraje Bhosale on Aurangzeb औरंगजेब चोर होता. तो देश लुटायला आला होता. त्याची कबर जेसीबी लावून उकडून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. जी लोक औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात, कदाचित ते त्यांचे भविष्य असावेत. त्यांनी ती कबर घेऊन स्वतःच्या घरी घेऊन जावी. मात्र औरंगजेबाचं उदातीकरण आता खपवून घेतलं जाणार नाही, असे म्हणत उदयनराजे भोसले भडकले. ते साताऱ्यात बोलत होते.

सध्या अधिवेशन सुरू आहे, या काळात एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे. परत कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याचं धाडस कुणी केलं नाही पाहिजे. नॉन बेलेबल कायदा पास करावा. याच तपास डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याने करावा. जर पदावर असणाऱ्या माणसाने असे वक्तव्य केलं, तर त्याच त्वरित निलंबन झालं पाहिजे. याच अधिवेशनात हा स्पेशल कायदा पास करून दाखवून द्या. छत्रपती शिवरायांचा अधिकृत इतिहास सरकारने जाहीर करावा, ज्यामुळे असे प्रश्न सारखे सारखे उद्भवणार नाहीत, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com