Beed Crime News | घरावर हल्ला! कारण काय तर "भाजपला मतदान केलं म्हणून..."

तू गावाकडे जाऊन कमळाला मतदान का केलं ? म्हणून बीडमध्ये घरावर दगडफेक करत, हल्ला करण्यात आलाय. यावेळी घरासमोर लावलेल्या कारची तोडफोड केलीय. त्यानंतर घरात घुसून अशोक राऊतमारे यांना बेदम मारहाण करत सामानाची नासधुस करण्यात आलीय.

Beed Crime | तू गावाकडे जाऊन कमळाला मतदान का केलं ? म्हणून बीडमध्ये घरावर दगडफेक करत, हल्ला करण्यात आलाय. यावेळी घरासमोर लावलेल्या कारची तोडफोड केलीय. त्यानंतर घरात घुसून अशोक राऊतमारे यांना बेदम मारहाण करत सामानाची नासधुस करण्यात आलीय. ही घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान घडली असून या बीड शहरातील घटनेने दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे..तर ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अनिल पांडुरंग पाटील, दादा सोनवणे, दादा यादव आणि अन्य दोन जणांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर यातील एका आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिलीये..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com