VIDEO : मविआतील तिढा सुटला, दसऱ्यापूर्वी जागावाटपाची घोषणा ?
विदर्भातील काही जागांमुळे महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र मंगळवारी होणाऱ्या बैठकीत पुन्हा एकदा यावर चर्चा करून दसऱ्यापूर्वी जागावाटपाची घोषणा होईल अशीही माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कोणाला किती जागा मिळणार यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून तिढा कायम असल्याने आता चर्चा आणि बैठकांचा वेग वाढला आहे. यातून तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी प्रयत्न करत आहे. मात्र अद्यापही विदर्भातील काही जागांवरून मविआत तिढा कायम असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी पुन्हा यावर बैठक होणार आहे. दरम्यान, नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात किंवा दसऱ्यापर्यंत जागा वाटप होऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाईल असं बोललं जात आहे. तर ज्या वादाच्या जागा आहेत त्यावर नंतर निर्णय घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.