Maharashtra Politics : उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच ?

Nashik News : नाशिक पश्चिम मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या भाऊगर्दीने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. या मतदारसंघात भाजपाचेच सर्वाधिक इच्छुक उमेदवार असल्याने भाजप नेत्यांमध्येच आता टिकीटासाठी चढाओढ लागली आहे.

विधानसभेसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार असण्याची शक्यता आहे. नाशिक मध्य मतदारसंघावरून एकीकडे भाजप शिंदे गटात वादाची ठिणगी असतानाच दुसरीकडे नाशिक पश्चिम मतदारसंघात तिकिटावरून भाजप नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्हं दिसत आहे.

नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपाचेच सर्वाधिक इच्छुक उमेदवार आहेत. भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून प्रचार देखील सुरू केला आहे. सध्या या मतदारसंघात सीमा हीरे या आमदार आहेत. त्यामुळे सीमा हीरे, प्रदीप पेशकार, लक्ष्मण सावजी, शशी जाधव, दिनकर पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते नाशिक पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता टिकीटावरून भाजप नेत्यांमध्ये भांडण जुंपण्याची आता चिन्ह दिसत आहेत. मात्र तिकीट नेमक कोणाला मिळेल हे बघण महत्वाच ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com