Anjali Damania On Eknath Khadse: खडसेंची राज्यपालपदी शिफारस न करण्याची दमानियांची मागणी
खडसेंविरोधात अंजली दमानिया यांनी वक्तव्य केलंय. खडसेंची राज्यपालपदी नियुक्त करण्याची शिफारस नाकारावी, असं पत्र दमानिया यांनी राष्ट्रपतींना पाठवलंय. एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. हा प्रवेश अद्याप झाला नसला, तरी त्यावरुन अंजली दमानिया यांनी खडसेंविरोधात आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपतींना पत्र लिहिलंय. दरम्यान, या पत्राची आता राष्ट्रपतींकडून काय दखल घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय. भाजपात नाराज असलेल्या खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर खडसे हे शरद पवार गटात होते. पण त्यांच्या सुनेला उमेदवारी भाजपनं दिल्यानंतर खडसेंनी घेतलेल्या राजकीय भूमिकेनं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.