VIDEO: Andheri सबवे वाहतुकीसाठी बंद, मुसळधार पावसामुळे तुंबलं पाणी

Mumbai Andheri Subway News: मुंबई पूर्व उपनगरात पावसाची जोरदार हजेरी, मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती.

मुंबई पूर्व उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी देखील पावसाने जोर धरला होता त्यावेळी देखील अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचा पाहायला मिळाला होता, वाहतुकीचा देखील खोळंबा झाला होता. तर आज सकाळपासूनच सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटांपर्यंत पाणी तुंबल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com