Andheri Sub-Way Video: पावसाचं थैमान; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद!

Mumbai Rain News: मुंबईत सकाळपासूनच पावसाने थैमान घातलं आहे. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी सबवे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मुंबई: मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये 2.50 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. वाहनचालकांना या पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरम्यान अंधेरी पूर्व आणि पश्चिममध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. आणि याचा फटका रेल्वेला देखील बसला आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली पाहायला मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com