Amravati VIDEO: पूल नसल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास, खासदारांच्या बालेकिल्ल्यातच नागरिक असुरक्षित
अमरावतीत गावामधून जाण्यासाठी पूल नसल्यामुळे नागरिकांना वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते काळाशी या गावांना जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर नाला असून नाल्याला पूल नाही. त्यामुळे ग्रामस्थ, शाळा आणि महाविद्यालयातील मुलांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. आजारी आणि वयोवृद्ध लोकांना सुद्धा दवाखान्यात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्यास गावांचा संपर्क देखील तुटतो. हा तालुका खासदार बळवंत वानखेडे यांचा बालेकिल्ला आहे. ग्रामस्थांकडून अनेकदा पूल बांधण्याची मागणी केली आहे. परंतु या मागणी कडे दुर्लक्ष केलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.