Maharashtra Politics: पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण-भाऊ आषाढी एकादशी पर्यंत एकत्र येऊ शकतात, अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Amol Mitkari’s Shocking Statement:पवार काका-पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात अमोल मिटकरींनी मोठं विधान केले आहे. पांडुरंगाची इच्छा असल्यास बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात.

महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केल्यानंतर आज राज ठाकरे यांनी देखील त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर पडत असताना मी मातोश्रीवर चाललो आहे अशी गुगली टाकली. या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले, पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात, असा मोठा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकारींनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com