Ambadas Danve हे Manoj Jarange Patil यांच्या भेटीसाठी दाखल!

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले होते.मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस असून,जरांगेंची प्रकृती ढासळली आहे.

Ambadas Danve Meet Manoj Jarange patil: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले होते.मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस असून,जरांगेंची प्रकृती ढासळली आहे.प्रकृती खालावली असून देखील जरांगे पाटील हे उपोषणावर अजूनही ठाम आहेत.तसेच सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई , तानाजी सावंत आणि संदिपान भुमरे देखील जरांगेंची भेट घेण्यासाठी येणार आहेत.त्यामुळे आता सरकार मराठा आरक्षणावर तोडगा काढणार का? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.त्याचबरोबर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील जरांगेंच्या भेटीला आल्याने ते कोणती भूमिका घेणार? मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आक्रमक झालेत.सरकारची नेमकी आता भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com