Mumbai Rain VIDEO: सर्वसामान्यांसोबतच आता मंत्र्यांनादेखील मुसळधार पावसाचा तडाखा

Chhagan Bhujbal News: मध्यरात्री पासून पडणाऱ्या पावसाचा नागरिकांसोबतच मंत्र्यांनादेखील फटका बसला आहे, मंत्र्यांच्या बंगल्यासमोर पाणी साचलं असल्याची माहिती समोर येत आहे.

मध्यरात्रीपासूनच राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मुसळधार पावसाचा फटका नागरिंकांसोबतच मंत्र्यांना देखील बसला आहे. मुसळधार पावसामुळे मंत्र्यांचे बंगले पाण्यात गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छगन भुजबळ आणि अब्दुल सत्तार यांच्या मंत्रालयासमोरच्या शासकीय निवासस्थानी पाणी साचलं असल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसाचा तडाखा हा सर्वसामान्यांसोबतच आता मंत्र्यांनादेखील बसला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com