Alphonso Mango: अक्षयतृतीया सेल! आंब्याच्या दरात घट, खरेदीसाठी बाजारात नागरिकांची झुंबड|VIDEO

Akshaya Tritiya Boosts Mango Sales: आंबा हा फळांचा राजा आहे. विशेषतः कोकणातील हापूस हा आपल्या अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध असून उद्याच्या अक्षय तृतीयेला त्याची विशेष मागणी होत आहे.

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी कोकणातून पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांत हापूसची मोठी आवक सुरू झाली आहे.

आवक वाढल्याने दरात घट झाली असून, तयार हापूस बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. प्रकारांनुसार हापूसचा दर ५०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. हंगामातील दुसऱ्या टप्यात आंब्याची आवक वाढली असून बाजारात तयार आणि कच्चा आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. उद्या होणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील मार्केट यार्ड मध्ये आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळतेय. खरेदी चांगली होत असल्याने उत्पादक सुद्धा यामुळे समाधानी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com