Top Headlines @ 3 PM : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार, पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद कायम... वाचा ३ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार, ५ पोलिसांविरोधात फौजदारी खटला चालणार. राज्यात राजकीय घडामोडींना वेग. राज्यात २३ जानेवारीला मोठा भूकंप होणार.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

- बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला पोलिसच जबाबदार, न्यायालयीन चौकशी समितीचा हायकोर्टात अहवाल. ५ पोलिसांविरोधात फौजदारी खटला चालणार.

- राज्यात राजकीय घडामोडींना वेग. सिल्व्हर ओकवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये तासभर चर्चा, मविआच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चेची माहिती.

- एकनाथ शिंदेंची गरज संपली, त्यांना संपवून नवा 'उदय' पुढे येणार. वडेट्टीवारांचा मोठा दावा, तर उदय सामंतांसोबत २० आमदार, राऊतांचाही वडेट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा.

- शिंदे आणि माझ्यात कुणी वाद निर्माण करु नये, आमचे राजकारणापलीकडचे संबंध. उदय सामंतांची साम टीव्हीला EXCLUSIVE प्रतिक्रिया.

- पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती.

- राज्यात २३ जानेवारीला मोठा भूकंप होणार, शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांचं भाकित. ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com