Crime News : अभ्यासासाठी मैत्रीण घरी आली, मित्राची नियत फिरली; खोलीत डांबलं, नंतर... | VIDEO

Akola Crime News : मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अकोला जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यात उघडकीस आली आहे. अभ्यासासाठी मैत्रीण घरी आली. तिला पाहून तिच्या मित्राची नियत फिरली. त्यानं तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मैत्रिणीने त्याला कडाडून विरोध केला. त्यानंतर आरोपीने तिला खोलीत डांबून ठेवले.

अकोला जिल्ह्यात ही धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना घडली आहे. मैत्रीण आपल्या मित्राकडे अभ्यास करण्यासाठी गेली होती. मित्राची आपल्यावर वाईट नजर आहे, हे तिला कळलंही नाही. त्यानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीने जोरदार प्रतिकार केला. त्यानंतर चिडलेल्या मित्रानं तिला खोलीमध्ये डांबून ठेवलं. याबाबत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मित्राच्या जाळ्यात अडकलेल्या मुलीची त्यांनी सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com