Ajit Pawar: अजित पवारांनी घेतला यवतमधील परिस्थितीचा आढावा; लोकांना केलं मोठं आवाहन|VIDEO

Ajit Pawar Visit To Yavat: यवतमध्ये झालेल्या घटनेची अजित पवार यांनी पाहणी केली. गावातील शांतता अबाधित ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं. 'महाराष्ट्राची परंपरा ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची आहे,' असं ते प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवत गावामध्ये सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टवरून हिंसाचार झाला आणि दोन गटामध्ये मोठा राडा झाला. आज गावचा बाजार असल्याने लोक मोठ्यासंख्येने बाहेर होते. यामुळे गाड्यांची तोडफोड आणि घरे जाळण्यात आली. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने यवतमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोणीतरी व्हाट्सअॅपवर पोस्ट केली आणि त्यामुळे हा तणाव निर्माण झाला. मी यवतकरांना सांगू इच्छीतो की, ज्याने कुणी ही पोस्ट केली आहे त्याचा येथील लोकांशी काही जवळचा संबंध नाही. तो काही वर्षांपूर्वी नांदेडवरुन आलेला आहे. तो गवंड्याचे काम करतो. पण मागील काही घटना घडल्यामुळे त्याने आक्रमक भूमिका घेतलेली दिसते. इथे काही तोडफोड केलेली दिसत आहे. या संदर्भातील पंचनामे आणि इतर गोष्टी होतील. आम्ही या घटनेवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. हा शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. नेहमीच सर्वांना पुढे घेऊन जाणे आणि जातीय सलोखा ठेवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com