Ajit Pawar : बारामतीतच अजित पवारांचा ताफा अडवला; नेमकं काय घडलं? पाहा Video

Baramati News : विधानसभेला अजित पावर शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आज बारामतीकरांनी आपल्या मागणीसाठी खुद्द अजितदादांचा ताफा अडवलेला दिसला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा बारामतीत कार्यकर्त्यांनी अडवला आहे. बारामतीतूनच अजित पवार यांनी निवडणूक लढवायला हवी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

अजित पवार यांच्यासाठी बारामतीकर मंगळवारी रस्त्यावर उतरलेले दिसले. यावेळी खुद्द अजितदादांचाच ताफा बारामतीकरांनी अडवलेला बघायला मिळाला. अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक बारामतीतूनच लढवावी या मुख्य मागणीसाठी कार्यकर्ते आग्रही भूमिका घेताना बघायला मिळाले आहे. अजित पवार हे शिरूर मतदारसंघातून उभे राहणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर बारामतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत अजित दादांनी बारामतीमधूनच विधानसभेसाठी उभं राहावं अशी मागणी अजित पवार यांना केली. अजितदादांचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरलेले दिसले आणि आपली मागणी अजित यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा बारामतीत अडवला. यानंतर स्वत: अजित पावर यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत झालेले दिसले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त बघायला मिळाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com